तिच लक्ष फळ्याकडे, त्याच लक्ष तिच्याकडे

तिच लक्ष फळ्याकडे, त्याच लक्ष तिच्याकडे प्रेम म्हटलं की सर्वांचा आवडता विषय पूर्वीच प्रेम आणि आताच प्रेम.. तेव्हा मोबाईल कमी टिकायचे(china) आणि आताचे मोबाईल जास्त टिकतात(1+) त्याही पेक्षा प्रेम कमी टिकतं. राजवाडी सेकंडरी हायस्कूल असं आमच्या शाळेचं नाव होतं इयत्ता ९ वीत असताना माझ्या मित्राच्या बाबतीत एक किस्सा घडला.. त्याचा स्वभाव अत्यंत साधा, सरळ, लाजरा होता. दुपारी वर्ग भरायचे. पण सकाळी आम्ही शाळेतच सुरु असणाऱ्या क्लास ला होतो. एकूण २० जणांची बॅच! क्लास मद्ये ९ वी अ/ब सगळे एकत्रच होतो... खऱ्या कहाणीला सुरुवात झाली ती चिडवाचिडवी पासून.. सर्व मुलांनी माझ्या मित्राला चिडवण्याची सुरवात केली.. ९वी अ मद्ये शिकणारी पूजा.. सावळा रंग, बॉबकट अत्यंत साधा स्वभाव.. अगदी (शाळा वेबसिरीज मधील अनुश्री मानेच) माझ्या मित्राचे सहकारी अजय सत्या, सागऱ्या,रुप्या निल्या आणि रोहित्या यातील रोहित्या, सागऱ्या आणि रुप्या यांची शाळेतील 'लव्हगुरु' अशी ओळख.. सर्वांना फुकटचा सल्ला या लव्हगुरुंकडून मिळायचा. या तिघांनी मिळून एक अनोखी शक्कल लढवली. माझ्या घाबरट मित्राला एक सल्ला दिला 'प्रेमपत्र' लि...