'ढोलकी'


२००७ मध्ये अचानक दोघा तिघांमध्ये चर्चा झाली की गणपतीत आरती करिता एक वाद्य घ्यावं त्यांनी ते स्व:खर्चाने घेतलं ते वाद्य म्हणजे आमची ढोलकी. याचं ढोलकी वर थाप पडते त्याच वेळी सर्वच गावकरी तिच्या तालावर डोलू लागतात, गुनगुनू लागतात.  त्यामुळेच गणपती सण आमचा स्पेशल होत असतो.

 दरवर्षी गणपतीला सहकुटुंब सहपरिवार गावी जायची सुरवात झाली. गणपतीच्या सणाला दरवर्षी आरती, भजन, नाच, धनगरी गजा नृत्य, आणि विशेष म्हणजे महिलांच्या फुगड्या या सर्व गोष्टींना याचं ढोलकीमुळे रंग येऊ लागला. आणि पाहता पाहता २००६ साली लावलेल्या रोपट्याचं आज झाड झालं ते म्हणजे आमचं 'गणेश नवतरुण मित्र मंडळ निवधे कोलापटेवाडी' 

दोघा, तिघांनी सुरुवात केलेली या मंडळाला आज अनेक वाडीतील सदस्य एकत्र आले आणि गावच्या विकासाच्या दृष्टीने त्याची चर्चा सुरू झाली. वाडीत लागणारे महत्वाचं साहित्य या मंडळांनी खरेदी केल.  डोंगर दरीत बसेल आमच्या निवधे धनगरवाडीत विकासाची गंगा बहरली. याच मंडळाच्या माध्यमातून २०१४ साली एक विहिरीच खोतकाम करण्यात आलं त्यामध्ये साठीव पाणी असल्याने अनेकांची सोय झाली. लॉकडाऊच्या काळात या मंडळाच्या वतीने दोन 'बोरिंग' तसेच गवळीवाडी ते निवधे कोलापटेवाडी नळ पाईप लाईन योजना झाली. रत्नागिरी- कोल्हापुर NH66 कळकदार येथे जोडणारा रस्ता देखील या वाडीत मंडळाच्या विशेष मेहनतीने आणण्यात आला..


२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे देशाचे महत्वाचे दोन दिवस  याचं दिवशी या वाडीतील मंडळी एकत्र येऊन बैठक घेतात.वर्षभर विखुरलेली मंडळी या मीटिंग च्या निमिताने एकत्र येताय.  या बैठकी दरम्यान वर्षभराचा मंडळाच्या वतीने करण्यात आलेला खर्च यावर विचारविनिमय होतात आणि पुढे काय करावं या संदर्भात चर्चा होते. 


ढोलकी पासून सुरवात झालेल्या या आमच्या मंडळात आज लाखो रुपयांचे साहित्य एकीच्या बळावर जमले आहे. १५ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या बैठकीत या गावकर्यांच्या चेवऱ्यावर वेगळा आनंद बहरलेला पाहायला मिळाला.

Comments