थेट काळजाला भिडणार वाद्य! "कला आणि कलाकार"
फेसबुक व्हिडिओ लिंक
कामावरून परतीच्या प्रवासाला निघालो. कुर्ला- वाशी असा प्रवास होता ट्रेन मध्ये कच गर्दी. मानखुर्द स्टेशनवर ट्रेन आल्यानंतर हिरवा शर्ट आणि हिप-हॉप टोपी परिधान केलेला 15 ते 16 वर्षाचा एक मुलगा आणि त्याच्या सोबत एक छोटी मुलगी जेमतेम 9..10 वर्षाची असेल दोघेही ट्रेन मध्ये चढले. मुलाला पाहताक्षणी त्याचा आत्मविश्वास थोडासा डगमगलेला वाटला. मी त्याच्याकडे पुन्हा पाहिलं त्यांनी त्यांच्या खांद्याला लटकवलेल एक वाद्य काढलं.
हातात दोन अंगठ्याही होत्या. आता ते सर्व पाहून मीच भांबावलो नक्की हा करणार तरी काय आहे? या प्रश्नात मी होतो. त्याने ते खांद्याचं वाद्य काढलं. थोडंस त्यावर हलक्या हाताने सूर लावला आणि त्याचं सुरात त्यांनी हिंदी सिनेमांची गाणी त्यावर वाजवायला लागला. ते पाहून विश्वासच बसत नव्हता की त्या मुलांकडे एवढी सुंदर कला असेल.
त्याच्या त्या गाण्यांच्या सुरवावर छोट्या मुलीच्या हातात 2 प्लेन लादीच्या कपरी होत्या. तिने ही त्या मुलाला डोलक पद्धतीने साथ दिली आणि मग काय सर्व प्रवाशांच्या नजरा फक्त त्या दोघांकडेच मी ही कानातील एरफोन काढले आणि त्यांच्याकडे पाहु लागलो.
शेवटचे पाच मिनिटे होती गाडी वाशीला यायला त्या पाच मिनिटात त्या दोन मुलांनी सर्व प्रवाशांची मन जिंकली त्याची ते वाद्य वाजवण्याची कला पाहून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
वाशीला उतरून ती मुलं दुसऱ्या डब्ब्यात चढली गर्दी असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता आला नाही .. सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे की ती रातोरात एखाद्या व्यक्तीचे चांगले दिवस बदलू शकते आणि त्याच उद्देशाने माझ्याही मनात आलं की आपण या मुलांचा व्हिडिओ करून समाज माध्यमांवर शेअर करू कदाचित त्यामुळे या मुलांच्या संघर्षाचे दिवस बदलतील .. त्यांना एखादा चांगला प्लॅटफॉर्म मिळेल...
सोबत फेसबुक लिंक दिली आहे त्यावर आपण व्हिडिओ देखील पाहु शकता...
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0fsLVjBbXYyz9gg6VQTi4ZjAhHEW8AgJcvgPfDjmpK5sQKbcPxMFqNMTdesrhrVssl&id=100003355704326
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0fsLVjBbXYyz9gg6VQTi4ZjAhHEW8AgJcvgPfDjmpK5sQKbcPxMFqNMTdesrhrVssl&id=100003355704326
ReplyDelete