Posts

थेट काळजाला भिडणार वाद्य! "कला आणि कलाकार"

Image
फेसबुक व्हिडिओ लिंक कामावरून परतीच्या प्रवासाला निघालो. कुर्ला- वाशी असा प्रवास होता ट्रेन मध्ये कच गर्दी. मानखुर्द स्टेशनवर ट्रेन आल्यानंतर हिरवा शर्ट आणि हिप-हॉप टोपी परिधान केलेला 15 ते 16 वर्षाचा एक मुलगा आणि त्याच्या सोबत एक छोटी मुलगी जेमतेम 9..10 वर्षाची असेल दोघेही ट्रेन मध्ये चढले. मुलाला पाहताक्षणी त्याचा आत्मविश्वास थोडासा डगमगलेला वाटला. मी त्याच्याकडे पुन्हा पाहिलं त्यांनी त्यांच्या खांद्याला लटकवलेल एक वाद्य काढलं.  हातात  दोन अंगठ्याही होत्या. आता ते सर्व पाहून मीच भांबावलो नक्की हा करणार तरी काय आहे? या प्रश्नात मी होतो. त्याने ते खांद्याचं वाद्य काढलं. थोडंस त्यावर हलक्या हाताने सूर लावला आणि त्याचं सुरात त्यांनी हिंदी सिनेमांची गाणी त्यावर वाजवायला लागला. ते पाहून विश्वासच बसत नव्हता की त्या मुलांकडे एवढी सुंदर कला असेल.  त्याच्या त्या गाण्यांच्या सुरवावर छोट्या मुलीच्या हातात 2 प्लेन लादीच्या कपरी होत्या. तिने ही त्या मुलाला डोलक पद्धतीने साथ दिली आणि मग काय सर्व प्रवाशांच्या नजरा फक्त त्या दोघांकडेच मी ही कानातील एरफोन काढले आणि त्यांच्याकड...

'ढोलकी'

Image
२००७ मध्ये अचानक दोघा तिघांमध्ये चर्चा झाली की गणपतीत आरती करिता एक वाद्य घ्यावं त्यांनी ते स्व:खर्चाने घेतलं ते वाद्य म्हणजे आमची ढोलकी. याचं ढोलकी वर थाप पडते त्याच वेळी सर्वच गावकरी तिच्या तालावर डोलू लागतात, गुनगुनू लागतात.  त्यामुळेच गणपती सण आमचा स्पेशल होत असतो.  दरवर्षी गणपतीला सहकुटुंब सहपरिवार गावी जायची सुरवात झाली. गणपतीच्या सणाला दरवर्षी आरती, भजन, नाच, धनगरी गजा नृत्य, आणि विशेष म्हणजे महिलांच्या फुगड्या या सर्व गोष्टींना याचं ढोलकीमुळे रंग येऊ लागला. आणि पाहता पाहता २००६ साली लावलेल्या रोपट्याचं आज झाड झालं ते म्हणजे आमचं 'गणेश नवतरुण मित्र मंडळ निवधे कोलापटेवाडी'  दोघा, तिघांनी सुरुवात केलेली या मंडळाला आज अनेक वाडीतील सदस्य एकत्र आले आणि गावच्या विकासाच्या दृष्टीने त्याची चर्चा सुरू झाली. वाडीत लागणारे महत्वाचं साहित्य या मंडळांनी खरेदी केल.  डोंगर दरीत बसेल आमच्या निवधे धनगरवाडीत विकासाची गंगा बहरली. याच मंडळाच्या माध्यमातून २०१४ साली एक विहिरीच खोतकाम करण्यात आलं त्यामध्ये साठीव पाणी असल्याने अनेकांची सोय झाली. लॉकडाऊच्या काळात या मंडळा...

"साहेब हात जोडतो पण आम्हाला रस्ता द्या"

Image
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना एका छोट्याशा वाडीवरच्या नागरिकांची सरकारला ही विनंती आहे....मुलभूत सुविधांसाठी हात जोडण्याची वेळ नागरिकांवर यावी यापेक्षा दुर्दैव काय असते, असा प्रश्न निर्माण होत आहे....ही व्यथा आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मिर्ले धनगरवाडीच्या गावकऱ्यांची....दोन दिवसांपूर्वी याच धनगर वाडीतील एका ९० वर्षांच्या आजींना रस्ता नसल्याने झोळीत घालून नेण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता....त्या ठिकाणी जाऊन आमचे प्रतिनिधी कृष्णा कोलापटे यांनी वास्तव जाणून घेणार ग्राऊंड रिपोर्ट... सोशल-मिडीयावर डोलीतून ९० वर्षीय आजीला दवाखाण्यात आणतानाचा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहिल्यानंतर फक्त एकच विषय मनात घोळत होता. तो म्हणजे ह्या आजीची भेट घ्यायची आणि या बातमीच्या मुळाशी जायचं ठरवलं. पनवेल वरून थेट कोकणकन्याने खेड स्टेशन गाठलं आणि तेथून चोरवणे एसटीने पहाटे ५. ३० वाजता मिर्ले गाव गाठलं. पावसाची रिप रिप चालूच होती. अरुंद जंगलातून जाणारी चढावाची पायवाट. वाटेला दगडावर आलेली शेवाळं देखील पाय टेकू देत नव्हती. त्यामुळे या पडझडीच्या वाटेवर भल्या पावसातून घामाच...

भिरभिरती नजर तिच्या शोधात..तिला आजही आठवलं तरी हसू फूटते गालात...असं हे शाळेतील पहिलं प्रेम

Image
  भिरभिरती नजर तिच्या शोधात..तिला आजही आठवलं तरी हसू फूटते गालात...असं हे शाळेतील पहिलं प्रेम १० ते १२ वर्षानंतर त्यांची अचानक भेट झाली. मित्रांसोबत गणपतीचे दर्शन घेत असतानाच गणपतीने 'साक्षात्कार' करावा असंच काहीस.. ती आणि तो सामोरा-समोर धडकले त्यांच्या नजरा एकमेकांना ओळखत होत्या. साध्या, सरळ, लाजाळू स्वभावाचा मित्र तिला चोर नजरेनं पाहत होता. आता बोलावं कस हा प्रश्न होताच? पण योगायोग असा की, तिनेच आपल्या मैत्रिणीला सांगून एक ग्रुप फोटो घ्यायला सांगितला.. तोवरच शाळेतील जुन्या गोष्टीनी मेंदूवर जोर धरला होता. आणि राहून गेलेल्या काही आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. माझ्या मित्राच्या मनात पूजा बद्दल कोणत्याही प्रेमाच्या भावना नव्हत्या. सागऱ्या आणि रुप्याच्या सांगण्यावरून 'बदामाच' ग्रीटींग देण्याचा शहाणपणा त्याला नडला होता. ही त्याच्या सोबत घडलेली एक साधारण घटना होती. परंतु पूजा सोबत असणारी तिची क्लास मधील मैत्रीण रेणू दिसायला अतिशय सुंदर होती. तीचे लांब केस, गोरा रंग , गोल चेहरा जणू गुलाबाची कळीच. अभिनेत्री प्राजक्ता माळी दिसायचीना अगदी तशी.. अक्षरशः वर्गातील अर्ध्यापेक्षा ज...

तिच लक्ष फळ्याकडे, त्याच लक्ष तिच्याकडे

Image
तिच लक्ष फळ्याकडे, त्याच लक्ष तिच्याकडे    प्रेम म्हटलं की सर्वांचा आवडता विषय पूर्वीच प्रेम आणि आताच प्रेम.. तेव्हा मोबाईल कमी टिकायचे(china) आणि आताचे मोबाईल जास्त टिकतात(1+) त्याही पेक्षा प्रेम कमी टिकतं. राजवाडी सेकंडरी हायस्कूल असं आमच्या शाळेचं नाव होतं इयत्ता ९ वीत असताना माझ्या मित्राच्या बाबतीत एक किस्सा घडला.. त्याचा स्वभाव अत्यंत साधा, सरळ, लाजरा होता. दुपारी वर्ग भरायचे. पण सकाळी आम्ही शाळेतच सुरु असणाऱ्या क्लास ला होतो. एकूण २० जणांची बॅच! क्लास मद्ये ९ वी अ/ब सगळे एकत्रच होतो... खऱ्या कहाणीला सुरुवात झाली ती चिडवाचिडवी पासून.. सर्व मुलांनी माझ्या मित्राला चिडवण्याची सुरवात केली.. ९वी अ मद्ये शिकणारी पूजा.. सावळा रंग, बॉबकट अत्यंत साधा स्वभाव.. अगदी (शाळा वेबसिरीज मधील अनुश्री मानेच) माझ्या मित्राचे सहकारी अजय सत्या, सागऱ्या,रुप्या निल्या आणि रोहित्या यातील रोहित्या, सागऱ्या आणि रुप्या यांची शाळेतील 'लव्हगुरु' अशी ओळख.. सर्वांना फुकटचा सल्ला या लव्हगुरुंकडून मिळायचा. या तिघांनी मिळून एक अनोखी शक्कल लढवली. माझ्या घाबरट मित्राला एक सल्ला दिला 'प्रेमपत्र' लि...