भिरभिरती नजर तिच्या शोधात..तिला आजही आठवलं तरी हसू फूटते गालात...असं हे शाळेतील पहिलं प्रेम
भिरभिरती नजर तिच्या शोधात..तिला आजही आठवलं तरी हसू फूटते गालात...असं हे शाळेतील पहिलं प्रेम १० ते १२ वर्षानंतर त्यांची अचानक भेट झाली. मित्रांसोबत गणपतीचे दर्शन घेत असतानाच गणपतीने 'साक्षात्कार' करावा असंच काहीस.. ती आणि तो सामोरा-समोर धडकले त्यांच्या नजरा एकमेकांना ओळखत होत्या. साध्या, सरळ, लाजाळू स्वभावाचा मित्र तिला चोर नजरेनं पाहत होता. आता बोलावं कस हा प्रश्न होताच? पण योगायोग असा की, तिनेच आपल्या मैत्रिणीला सांगून एक ग्रुप फोटो घ्यायला सांगितला.. तोवरच शाळेतील जुन्या गोष्टीनी मेंदूवर जोर धरला होता. आणि राहून गेलेल्या काही आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. माझ्या मित्राच्या मनात पूजा बद्दल कोणत्याही प्रेमाच्या भावना नव्हत्या. सागऱ्या आणि रुप्याच्या सांगण्यावरून 'बदामाच' ग्रीटींग देण्याचा शहाणपणा त्याला नडला होता. ही त्याच्या सोबत घडलेली एक साधारण घटना होती. परंतु पूजा सोबत असणारी तिची क्लास मधील मैत्रीण रेणू दिसायला अतिशय सुंदर होती. तीचे लांब केस, गोरा रंग , गोल चेहरा जणू गुलाबाची कळीच. अभिनेत्री प्राजक्ता माळी दिसायचीना अगदी तशी.. अक्षरशः वर्गातील अर्ध्यापेक्षा ज...