तिच लक्ष फळ्याकडे, त्याच लक्ष तिच्याकडे
तिच लक्ष फळ्याकडे, त्याच लक्ष तिच्याकडे
प्रेम म्हटलं की सर्वांचा आवडता विषय
पूर्वीच प्रेम आणि आताच प्रेम.. तेव्हा मोबाईल कमी टिकायचे(china) आणि आताचे मोबाईल जास्त टिकतात(1+) त्याही पेक्षा प्रेम कमी टिकतं.
राजवाडी सेकंडरी हायस्कूल असं आमच्या शाळेचं नाव होतं इयत्ता ९ वीत असताना माझ्या मित्राच्या बाबतीत एक किस्सा घडला.. त्याचा स्वभाव अत्यंत साधा, सरळ, लाजरा होता. दुपारी वर्ग भरायचे. पण सकाळी आम्ही शाळेतच सुरु असणाऱ्या क्लास ला होतो. एकूण २० जणांची बॅच! क्लास मद्ये ९ वी अ/ब सगळे एकत्रच होतो...
खऱ्या कहाणीला सुरुवात झाली ती चिडवाचिडवी पासून.. सर्व मुलांनी माझ्या मित्राला चिडवण्याची सुरवात केली.. ९वी अ मद्ये शिकणारी पूजा.. सावळा रंग, बॉबकट अत्यंत साधा स्वभाव.. अगदी (शाळा वेबसिरीज मधील अनुश्री मानेच) माझ्या मित्राचे सहकारी अजय सत्या, सागऱ्या,रुप्या निल्या आणि रोहित्या यातील रोहित्या, सागऱ्या आणि रुप्या यांची शाळेतील 'लव्हगुरु' अशी ओळख.. सर्वांना फुकटचा सल्ला या लव्हगुरुंकडून मिळायचा.
या तिघांनी मिळून एक अनोखी शक्कल लढवली. माझ्या घाबरट मित्राला एक सल्ला दिला 'प्रेमपत्र' लिहिण्याचा! माझा मित्र देखील क्रीएटीव्ह होता पण प्रेम म्हटलं की त्याची हातभार फटायची.. त्यामुळे लव्हगुरूंनी आणखी एक फुकट चा सल्ला दिला तो म्हणजे तिच्याकडून गाईड मागून घ्यायचं आणि त्यात प्रेमपत्र ठेवायचं... ठरल्या प्रमाणे सर्व प्लॅन तयार झाला. आता फक्त तो प्लॅन अंमलात आणायचा होता. माझ्या मित्राने आपल्या क्रिएटिव्ह मद्ये 'बदामाचं' छान ग्रीटिंग बनवलं आणि त्यात त्याने तीन जादुई शब्द लिहिले. 'I LOVE YOU!'
नेहमी प्रमाणे शाळेत आल्यावर त्याने तिचं गाईड तिला परत केलं.. तिनेही ते न पाहता बॅगेत टाकलं... आणि घरी गेली. दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यानंतर पूजा ने रडायची सुरुवात केली.. सर्व क्लास मध्ये भयाण शांतता पसरली होती आणि सर्व जण वाट पाहत होते ते क्लास मद्ये शिकवणाऱ्या अंजनी ताई आणि नंदिनी ताईंची..
जशी ताईची क्लास मद्ये एंट्री झाली पूजाने जोरजोरात रडायची सुरवात केली. आणि सुरू झालं ते 'इन्वेस्टिंगेशन...' पूजा च्या मैत्रिणींसह अंजनी ताई पूजाला शांत करत होती. तिने बॅगेतून गाईड काढलं आणि ताईंला दिलं... ताईने ते उघडून पाहिलं आणि त्यात मित्राने ठेवलेलं ते ग्रीटिंग सगळ्यांसमोर आलं. माझ्या मित्राच्या बाबतीत पुढे काय घडलं असेल ते तआपणच ठरवा आणि कंमेंट मध्ये उर्वरित कथा पूर्ण करा. पाहुयात ही कथा कोणतं नवं रूप घेते ते......
Nice story bhava........
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThankx bro
ReplyDelete