भिरभिरती नजर तिच्या शोधात..तिला आजही आठवलं तरी हसू फूटते गालात...असं हे शाळेतील पहिलं प्रेम

 भिरभिरती नजर तिच्या शोधात..तिला आजही आठवलं तरी हसू फूटते गालात...असं हे शाळेतील पहिलं प्रेम


१० ते १२ वर्षानंतर त्यांची अचानक भेट झाली. मित्रांसोबत गणपतीचे दर्शन घेत असतानाच गणपतीने 'साक्षात्कार' करावा असंच काहीस.. ती आणि तो सामोरा-समोर धडकले त्यांच्या नजरा एकमेकांना ओळखत होत्या. साध्या, सरळ, लाजाळू स्वभावाचा मित्र तिला चोर नजरेनं पाहत होता. आता बोलावं कस हा प्रश्न होताच? पण योगायोग असा की, तिनेच आपल्या मैत्रिणीला सांगून एक ग्रुप फोटो घ्यायला सांगितला.. तोवरच शाळेतील जुन्या गोष्टीनी मेंदूवर जोर धरला होता. आणि राहून गेलेल्या काही आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

माझ्या मित्राच्या मनात पूजा बद्दल कोणत्याही प्रेमाच्या भावना नव्हत्या. सागऱ्या आणि रुप्याच्या सांगण्यावरून 'बदामाच' ग्रीटींग देण्याचा शहाणपणा त्याला नडला होता. ही त्याच्या सोबत घडलेली एक साधारण घटना होती. परंतु पूजा सोबत असणारी तिची क्लास मधील मैत्रीण रेणू दिसायला अतिशय सुंदर होती. तीचे लांब केस, गोरा रंग , गोल चेहरा जणू गुलाबाची कळीच. अभिनेत्री प्राजक्ता माळी दिसायचीना अगदी तशी.. अक्षरशः वर्गातील अर्ध्यापेक्षा जास्त मुलं तिच्यावर मरत होती..

आम्ही एकाच क्लास मद्ये होतो. क्लासचा दरवर्षी वार्षिक महोत्सव असायचा.. आणि त्याकरिता प्रत्येक वर्गातून काही तरी कला सादर करावी लागत असे.. कहाणीला खरी सुरवात इथेच झाली... त्याच झालं असं की योगायोगाने रेणू आणि माझ्या मित्राची डान्स पार्टनर म्हणून निवड झाली.. त्याच्या मनात लाडू फुटत होते. आणि इथुनच मित्राच्या एकतर्फी प्रेमाची सुरवात झाली.
15 दिवस डान्स प्रॅक्टिस.. तशी रेणू ही 'आकडू' स्वभावाचीच होती.. पण आपला मित्रही काही कमी न्हवता ! ...एकदाही बोलला नाही तिच्याशी... 'डरपोक' कुठला... त्यावेळी भरत जाधव चा 'गलगले निघाले' चित्रपट पडद्यावर गाजत होता. त्याचं फेमस गाणं "नवरी मांडवा खाली' (Navari Mandva Khali) यावर आमच्या शाळेने डान्स बसवला होता. गाण्याची सुरुवातच मंगलाष्टकांपासून होती.

विविध रंगानी रंगलेला रंगमचं आणि पूर्ण खचाखच भरलेलं प्रेक्षागृह या कार्यक्रमाला चांगलाच प्रतिसाद देत होते. मात्र मित्राच्या मनात वेगळाच विषय होता.. त्याच्या मनात सतत 'लाडू' फुटतच होते कारण यामध्ये माझ्या मित्राचं आणि रेणूचं स्टेजवर करण्यात आलेल नाटकरूपी 'लग्न' होतं. अगदी गळ्यातील हारापासून ते अक्षदा म्हणून त्या दोघांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. जणू काही लग्न करून नवीन संसाराची सुरुवात करणार होते. अशा पद्धतीचं नृत्य चर्चगेट येथील एका सभागृहामध्ये करण्यात आले होतं. सर्वांसाठी तो डान्स होता पण माझ्या मित्राच्या मनात आजही तिच्यासोबत झालेलं खोटं खोटं लग्न कायमस्वरूपी घर करून गेलं.

त्याने कधीच तिला मनातलं सांगण्याची हिंमत केली नाही, तिच्यासोबत बोलला नाही. कायम भीत राहिला. एकदा अशीही गंम्मत झाली होती. त्याने तिच्या नावाचा 'R' हे अक्षर आपल्या हातावर काढलं होत.. रेणूने त्याला विचारलं 'R'अक्षरं कोणाचं आहे. त्यावेळी मित्राची 'टरकली'.. आणि त्यानें खरं न सांगता थातूर माथूर उत्तर दिलं आणि वेळ मारून नेली. त्याने तिथून पळ काढला.. अगोदरच पूजा सोबत झालेलं 'लव्ह लेटर' चं प्रकरण ताज होतं. त्यामुळे त्याच नाव खराब झाल्याची शंका आणि ढासळलेला आत्मविश्वास, त्यात पालकांची भीती, शिक्षकांची भीती मुलांच्या मनात कायम असायची. तशी ती यांच्याही मनात होती. पण करणार काय माझ्या या साध्या मित्राला रेणू आवडत होती. तो मनापासून तिच्याच्यावर प्रेम करत होता. नेहमी रेणूची एक झलक पाहण्यासाठी तो अक्षरशः झुरत असायचा. हे त्याच्या मित्रांनाही माहित होतं. सत्या, निल्या, आज्या उम्या, रोहित्या हे फक्त चिडवून मज्या घ्यायचे रेणू कडक शिस्तीची होती. त्यामुळे सर्वच तिला घाबरून राहत होते. पण त्याची रेणुसोबतची ही केमिस्ट्री केव्हाच जुळली नाही. १० ते १२ वर्षानंतर त्यांची अचानक भेटीने
जून्या राहुन गेलंल्या आठणींना उजाळा दिला. शाळेतील दिवस आणि त्या मधुर आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.


राहून गेलेल
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

Comments

Post a Comment